सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण ; जाणून घ्या

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज घट झाली आहे. आज प्रति किलो चांदीच्या किंमतीत 1141 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चांदीची किंमत 68 हजार 379 रुपये प्रति किलो झाली आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 26.35 डॉलर प्रति औंस आहे.

    नवी दिल्ली : आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याच्या दरात 355 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 266 रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1791 डॉलर प्रति औंसवर आहे.