सोन्याच्या किंमतीत उसळी तर चांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारातही (Gold Price Today) सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 129 रुपये प्रति तोळाने वाढला आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर दिल्लीतील सराफा बाजारात 46,286 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहेत.

    भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 46 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. आज चांदीच्या किंमती (Silver Price Today) मात्र कमी झाल्या आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 46,157 रुपये होते. तर चांदीचे दर 60,489 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.

    आंतरराष्ट्रीय बाजारातही (Gold Price Today) सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 129 रुपये प्रति तोळाने वाढला आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर दिल्लीतील सराफा बाजारात 46,286 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहेत.

    आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,757 डॉलर प्रति औंसवर आहेत. चांदीचे आजचे दर (Silver Rate Today) चांदीच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे.