सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त; आताच करा खरेदी, जाणून घ्या दर…

सोने पुन्हा एकदा स्वस्त झाल्यानं खरेदीची चांगली संधी आहे. कारण ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२००च्या पातळीवर पोहोचले होते, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, असे कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

    नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीत ३१७ रुपयांची घसरण नोंदली गेलीय. दिल्ली सराफा मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम (Gold Rate Today) ३१७ रुपयांनी घसरून ४६,३८२ रुपयांवर बंद झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याचा भाव ४६,६९९ च्या पातळीवर बंद झाला होता.

    सोने पुन्हा एकदा स्वस्त झाल्यानं खरेदीची चांगली संधी आहे. कारण ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२००च्या पातळीवर पोहोचले होते, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, असे कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    या दिवाळीपर्यंत एमसीएक्सवरील सोन्याचा दर ५०हजारांच्या पातळीवर जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलरची वाढ आणि अमेरिकन बाँड उत्पन्नातील उसळीमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला.