दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे.

    नवी दिल्ली –  भारतीय रेल्वेअंतर्गत (Indian Railways) पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.

    पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे.

    उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.