प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही या मौल्यवान धातूंच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीदारांसमोर सोनं खरेदी करण्याची संधी आहे. देशांतर्गत बाजारात गुरुवारी देखील सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी 10 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 534 रुपये प्रति तोळांंनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही आज उतरले आहेत. एक किलो चांदीच्या दरात (Silver Price Today) 628 रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते.

दिल्ली (Delhi). आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही या मौल्यवान धातूंच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीदारांसमोर सोनं खरेदी करण्याची संधी आहे. देशांतर्गत बाजारात गुरुवारी देखील सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी 10 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 534 रुपये प्रति तोळांंनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही आज उतरले आहेत. एक किलो चांदीच्या दरात (Silver Price Today) 628 रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते.

चांदीचे दर काही दिवसांपूर्वी 63,339 रुपये प्रति किलो होते. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात घसरण झाल्याने भारतात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. सोन्याचे नवे भाव (Gold Price on 10th December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 534 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,652 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,835 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चांदीच्या दरात 628 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 62,711 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Market) चांदीचे दर 23.84 डॉलर प्रति औंस आहेत.

का कमी झाले सोने-चांदीचे भाव?
एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे (HDFC Securities) सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते आज सलग चौथ्या दिवशी डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयामध्ये (Rupee) घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती उतरल्या आहेत. याशिवाय कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्याने सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे. त्यांनी असे म्हटले की अमेरिकेत स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा झाली आणि डॉलरचे मुल्य कमी झाले तर सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.