नोकरदारांसाठी आनंदाची बातमी ; ५ लाखांपर्यंतची गुंतवणूक आता टॅक्स फ्री

मच्या ईपीएफ खात्यामध्ये ( EPF Account ) २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल, कारण त्यात नियोक्ता देखील त्याच्याकडून योगादान देतो. दरम्यान तुम्ही निश्चित १२ टक्क्यांच्या अतिरिक्त अतिरिक्‍त वॉलिंटरी प्रोव्हिडेंट फंड (VPF) आणि पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक केलात तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरील करामध्ये सूट मिळेल.

    दिल्ली: लोकसभेत मंजूर झालेल्या वित्त विधेयक २०२१ मध्ये केंद्र सरकारनेही काही दुरुस्ती केल्या आहेत. भविष्य निर्वाह निधीत (Provident Fund) गुंतवलेल्या रकमेवर मिळालेल्या व्याजावर केंद्र सरकारने कर सवलत मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढविली आहे. दरम्यान ज्यांची कंपनी पीएफमध्ये योगदान देत नाही अशा कर्मचार्‍यांना ही सूट मिळणार आहे.

    केंद्र सरकारने बजेट२०२१ मध्ये घोषणा केली होती की, जर तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये ( EPF Account ) २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल, कारण त्यात नियोक्ता देखील त्याच्याकडून योगादान देतो. दरम्यान तुम्ही निश्चित १२ टक्क्यांच्या अतिरिक्त अतिरिक्‍त वॉलिंटरी प्रोव्हिडेंट फंड (VPF) आणि पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक केलात तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरील करामध्ये सूट मिळेल.

    चांगले उत्पन्न मिळवणारे लोक आतापर्यंत टॅक्स फ्री हेवन म्हणून पीएफचा वापर करत असत, परंतु ही सूट २०२१च्या अर्थसंकल्पात मर्यादित केली गेली. नव्या यंत्रणेअंतर्गत एका वर्षामध्ये अडीच लाखाहून अधिक भविष्य निर्वाह निधी जमा करण्यावर मिळणारे व्याज करांच्या जागेवर येणार होते. उच्च उत्पन्न पगाराच्या लोकांना याचा थेट परिणाम झाला, जे करमुक्त व्याज मिळवण्यासाठी पीएफ वापरत असत.