मोदी सरकारसाठी आणखी एक आनंदाची बातमी : GST संकलनाचा वेग कायम

गेल्या दोन महिन्यात अर्थव्यवस्था कोरोना संकटातून सावरली असून, स्थानिक पातळीवर निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठांमधील रेलचेल वाढली. परिणामी जीएसटी संकलनात वाढ झाली, असे सरकारने म्हटले आहे.

    दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर संकलनाचा वेग कायम असून ऑगस्ट महिन्यात सरकारला १.१२ लाख कोटी मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या ऑगस्टमध्ये GST महसूल ३० टक्क्यांनी वधारला आहे.

    गेल्या दोन महिन्यात अर्थव्यवस्था कोरोना संकटातून सावरली असून, स्थानिक पातळीवर निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठांमधील रेलचेल वाढली. परिणामी जीएसटी संकलनात वाढ झाली, असे सरकारने म्हटले आहे.

    ऑगस्ट महिन्यात जीएसटीमधून १,१२,००० कोटींचा महसूल मिळाला आहे. यात सीजीएसटी २०,५२२ कोटी, एसजीएसटी २६,६०५ कोटी आणि आयजीएसटी ५६,२४७ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या २६,८८४ कोटी रुपयांसह) आणि उपकर ८६४६ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या ६६ कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले आहे.