Good news to Coal India employees this year Diwali celebration in a big way
कोल इंडियाच्या (Coal India) कर्मचाऱ्यांना खूशखबर; औंदा दिवाळी (Diwali) धुमधडाक्यात करणार साजरी

सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाने (Coal India) कामगारांना (employees) प्रत्येकी ६८,५०० रुपयांचा दिवाळी बोनस (Diwali Bonus) देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ कोल इंडिया आणि तिच्या आठ उपकंपन्यांमधील (8 Sub Companies) दोन लाख ६२ हजार कामगारांना मिळणार आहे.

  • ६८, ५०० रुपयांचा मिळणार दिवाळी बोनस

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली :

सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाने कामगारांना प्रत्येकी ६८,५०० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ कोल इंडिया आणि तिच्या आठ उपकंपन्यांमधील दोन लाख ६२ हजार कामगारांना मिळणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० वर्षाच्या ‘बोनस’साठी कंपनीकडून १७०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे कोल इंडियाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनीवर १७०० कोटींचा अतिरिक्त भार

कोल इंडियाने या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०१९-२० साठी परफॉरमन्स लिंक्ड रिवार्ड(पीआरएल) म्हणून ६८,५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीवर १७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. कोल इंडियाने एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. २५ ऑक्टोबरआधी कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. बोनसची रक्कम कामगारांच्या खात्यात २२ ऑक्टोबरपूर्वी जमा केली जाईल, असेही सांगण्यात आले. गतवर्षी कंपनीने प्रदान केलेल्या पीएलआर वेतनात यंदा ५.८७ टक्क्यांची म्हणजे प्रति कमागार ३८०० रुपयांची वाढ झाली आहे. सेवेत कमीत कमी ३० दिवस भरलेल्या सर्व बिगर- कार्यकारी श्रेणीच्या सर्व कामगारांना योग्य त्या प्रमाणात या बोनससाठी पात्र ठरविण्यात आले आहे.