employee

कोविड-१९चे (Covid -19) संकट वाढल्यामुळे एप्रिलमध्ये महागाई भत्तावाढ १ जुलै, २०२१ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याआधीची ४ टक्के वाढ जानेवारीत (January) प्रस्तावित करण्यात आली होती. मार्चमध्ये त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती.

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षात एप्रिलमध्ये (April) स्थगित करण्यात आलेली महागाई भत्त्यातील वाढ ( government employee)  २०२१ मध्ये पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता असल्यामुळे या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होऊ शकते. कोविड-१९चे (Covid -19) संकट वाढल्यामुळे एप्रिलमध्ये महागाई भत्तावाढ १ जुलै, २०२१ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याआधीची ४ टक्के वाढ जानेवारीत (January) प्रस्तावित करण्यात आली होती. मार्चमध्ये त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती.

सातव्या वेतन आयोगानुसार, जुलै, २०२१ पासून तो २१ टक्के होणे अपेक्षित आहे. सध्याच्या स्थगितीचा कार्यकाळ संपल्यानंतर महागाई भत्त्यात नियमित पद्धतीने वाढ केली जाईल, अशी आशा कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना वाटते. वाढत्या महागाईनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करते. त्यामुळे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६० लाख निवृत्तिवेतनधारकांना फायदा होणार आहे.