मोठी बातमी, बायोलॉजिकल ई कंपनीसोबत सरकारचा करार, मिळणार ३० कोटी लसींचे डोस

केंद्र सरकारनं नुकताच बायोलॉजिकल ई (Biological E) या कंपनीसोबत करार निश्चित केला असून या कंपनीच्या लसींचे ३० कोटी डोस बुक केलेत. बायोलॉजिकल ई ही मूळची हैद्राबादची कंपनी असून तिच्या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. पहिल्या दोन टप्प्यांतील मानवी चाचण्या यशस्वी झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची औपचारिकता पार पाडल्यानंतर या लसींचं उत्पादन बाजारात यायला सुरुवात होणार आहे. 

    भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून प्रभावी लसीकरण हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय मानला जातोय. मात्र भारतात सध्या कोरोनावरील लसींचा तुटवडा भासत असून लसींचं उत्पादन वाढवणे आणि नव्या लसींसाठी करार करण्याचं धोरण केंद्र सरकारनं अवलंबलंय.

    केंद्र सरकारनं नुकताच बायोलॉजिकल ई (Biological E) या कंपनीसोबत करार निश्चित केला असून या कंपनीच्या लसींचे ३० कोटी डोस बुक केलेत. बायोलॉजिकल ई ही मूळची हैद्राबादची कंपनी असून तिच्या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. पहिल्या दोन टप्प्यांतील मानवी चाचण्या यशस्वी झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची औपचारिकता पार पाडल्यानंतर या लसींचं उत्पादन बाजारात यायला सुरुवात होणार आहे.

    बायोलॉजिकल ई या कंपनीनं केंद्र सरकारने १५०० कोटी आगाऊ रक्कम देण्याची मागणी केली असून केंद्रानं ती मान्य केल्याचं समजतंय. ३० कोटी लसींसाठी केंद्र सरकार या कंपनीला दीड हजार कोटी देण्यास तयार असून तसा करारही पूर्ण झालाय.

    ऑगस्ट महिन्यापासून या कंपनीच्या लस उत्पादनाला सुरुवात होणार असून डिसेंबरपर्यंत या ३० कोटी लसींचं टप्प्याटप्प्यानं उत्पादन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. या लसींच्या उपलब्धतेनंतर भारताला अतिरिक्त ३० कोटी लसी मिळणार असून १५ कोटी भारतीयांची लसीकरणाची गरज पूर्ण होऊ शकणार आहे. जुलै महिन्यात फायझरची लसदेखील उपलब्ध होणार असून त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढायला मदत  होणार आहे.