#FarmersProtest (LIVE) | केंद्र सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप, विसाव्या दिवशीही जोर कायम | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट9 महीने पहले

केंद्र सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप, विसाव्या दिवशीही जोर कायम

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
09:47 AMDec 15, 2020

"अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार नाहीत"

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार नाहीत, यााचा विश्वास वाटत असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी म्हटलंय. जो कायदा शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याचं स्वातंत्र्य देतो, त्या कायद्याला विरोध करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारनं कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा जोर विसाव्या दिवशीदेखील कायम आहे. किंबहूना गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या सिंघु सीमेवर दाखल होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चाललीय.

सरकार कायदे रद्द करायला तयार नाही आणि ते आमच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोप काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलाय. १९ दिवस होऊनही आंदोलनाचा जोर कमी होत नसल्यामुळं सरकारची चिंता वाढत चाललीय. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सतत केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकाही सुरू आहेत.

केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचा जोर वाढवलाय. जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालण्यात आले. शेतकऱ्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणदेखील केलं. या उपोषणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील सहभागी झाले होते.

केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चर्चेची तयारी दाखवलीय. मात्र कायदे रद्द करण्याचं आश्वासन मिळाल्याशिवाय कुठलीच चर्चा होऊ शकत नाही, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलगंणा, बिहार आणि हरियाणाच्या १० शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली आणि कृषी कायद्यांना आपले समर्थन जाहीर केले. सरकार अशा संघटनांना हाताशी धरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१७ शुक्रवार
शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१

वाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.