coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

देशातील ३० कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैनिक, स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश असेल. ५० पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांनादेखील पहिल्या टप्प्यातील लस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ५० पेक्षा कमी वय असलेल्या आणि विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनाही पहिल्या टप्प्यात सामावून घेतलं जाईल, असं डॉ. वर्धन यांनी सांगितलंय.

भारतात लवकरच कोरोना लस देण्याची प्रक्रिया सुरू होणार असून तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारनं या लसीच्या वाटपाचं सूत्र निश्चित केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.

देशातील ३० कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैनिक, स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश असेल. ५० पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांनादेखील पहिल्या टप्प्यातील लस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ५० पेक्षा कमी वय असलेल्या आणि विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनाही पहिल्या टप्प्यात सामावून घेतलं जाईल, असं डॉ. वर्धन यांनी सांगितलंय.

ज्याप्रमाणं आपण शिस्तबद्द आणि नियोजनबद्धरित्या पोलिओ हद्दपार केला, त्याचप्रमाणं कोरोनालादेखील हद्दपार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात ज्यांचा समावेश करण्यात आलाय, त्या सर्वांना आम्ही कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन करू. मात्र त्यातील कुणाला ही लस घ्यायची नसेल, तर सरकार जबरदस्ती करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. कोरोना लस घेणं कायद्यानं बंधनकारक असणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलंय.

या कामासाठी देशभरात प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला असून लस देण्याच्या प्रक्रियेसाठी २० हजार कर्मचाऱ्यांना तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलीय.