गुप्तहेर व सुरक्षा अधिकाऱ्यांवर सरकारचे निर्बंध; अनुभव कथनाच्या पुस्तकांवर बंदी

सेवानिवृत्तीनंतर अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने संवेदनशील पदावरून निवृत्ती घेतली असेल आणि त्यासंदर्भातील माहिती आपल्या पुस्तकांमधून किंवा लेखांमधून छापून आणली तर गोपनीय स्वरूपाची माहिती उघड होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. पुस्तक लिहीत असलेले आणि नियमितपणे वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये स्तंभ लिहिणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस प्रमुख आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यावर याचा परिणाम होणार आहे. जर हे निर्बंध मान्य नसतील तर त्याचा थेट परिणाम पेन्शनवर होऊन ती बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

  दिल्ली : सेवानिवृत्तीनंतर अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने संवेदनशील पदावरून निवृत्ती घेतली असेल आणि त्यासंदर्भातील माहिती आपल्या पुस्तकांमधून किंवा लेखांमधून छापून आणली तर गोपनीय स्वरूपाची माहिती उघड होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. पुस्तक लिहीत असलेले आणि नियमितपणे वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये स्तंभ लिहिणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस प्रमुख आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यावर याचा परिणाम होणार आहे. जर हे निर्बंध मान्य नसतील तर त्याचा थेट परिणाम पेन्शनवर होऊन ती बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

  केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, आता गुप्तहेर किंवा सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही खात्यातून निवृत्त होणारा कोणताही सरकारी कर्मचारी स्वतःच्या इच्छेनुसार आपले लेख किंवा पुस्तके प्रकाशित करू शकणार नाही. त्यांच्या प्रकाशनासाठी संबधित खात्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने जारी केली आहे.

  अधिसूचनेनुसार, हा निर्णय कॅगच्या सल्ल्यानुसार आणि घटनेच्या कलम 148 कलम 5 आणि कलम 309 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांनुसार घेण्यात आला आहे. तसेच केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1972 मध्ये सुधारणा करण्यात आली आहेत. निवृत्तीवेतनाच्या नियमानुसार अटींचे उल्लंघन केल्यास पेंन्शन थांबवण्यात येणार आहे. 31 मे पासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा