असं झालं असतं तर सरकारची प्रतिष्ठा वाढली असती, राऊतांची मोदी सरकारवर टीका

गेल्या ६० दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन संपूर्ण जग पाहत आहे. प्रजासत्ताक दिनी अभूतपूर्व ट्रॅक्टर रॅली निघेल. या रॅलीकडं पूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. दिल्लीत लाखो शेतकरी जमा झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यात मोर्चे निघत आहेत आणि आंदोलनं केली जात आहेत. केंद्र सरकारनं चर्चेच्या पहिल्याच फेरीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, असं शिवसेना खासदार राऊत यांनी म्हटलंय.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये चर्चेच्या एकामागून एक फेऱ्या होत आहेत. सरकार चर्चेच्या फेऱ्यांचे नवे विक्रम करण्याच्या पाठीमागे आहे. मात्र पहिल्या फेरीतच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते, तर मोदी सरकारची प्रतिष्ठा वाढली असती, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय.

गेल्या ६० दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन संपूर्ण जग पाहत आहे. प्रजासत्ताक दिनी अभूतपूर्व ट्रॅक्टर रॅली निघेल. या रॅलीकडं पूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. दिल्लीत लाखो शेतकरी जमा झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यात मोर्चे निघत आहेत आणि आंदोलनं केली जात आहेत. केंद्र सरकारनं चर्चेच्या पहिल्याच फेरीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, असं शिवसेना खासदार राऊत यांनी म्हटलंय.

भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न हा सोडवावाच लागेल. मात्र ६० दिवस शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊन तुम्ही देशातील वातावरण बिघडवता आहात, असा आरोप राऊतांनी केलीय. तुम्हाला अशांतता निर्माण करायची आहे किंवा तत्सम काही कारस्थान आहे का, अशी शंका येत असल्यांचंही राऊत यांनी म्हटलंय.