
देशात कोविड-१९ टॅक्स लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरणाचा खर्च टॅक्सच्या रुपात वसूल करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पात घोषणा करण्यापूर्वी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
दिल्ली : देशात कोविड-१९ टॅक्स लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरणाचा खर्च टॅक्सच्या रुपात वसूल करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पात घोषणा करण्यापूर्वी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन याचा मोठा आर्थिक फटका केंद्र सरकारला बसला आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित व्यक्तींवरील उपचार आणि अन्य उपाययोजनांसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे.
कोरोनामुळे होत असलेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी कोविड-१९ सेस लावण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप केवळ चर्चा सुरू असून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
उच्च उत्पन्न गटात येणाऱ्यांकडून तसेच इनडायरेक्ट टॅक्सच्या रूपात हा सेस लागू करण्यात येऊ शकतो. तसेच केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कस्टम ड्युटीवरही सेस लावला जाऊ शकतो.