राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका ; बच्चू कडू यांचं गंभीर विधान

शिक्षण मंत्री बच्चू कडू हे दिल्लीत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यपाल नियमबाह्य काम करतात. त्यात राष्ट्रपतींनी लक्ष घालायला हवं. राष्ट्रपतींनी आता राजभवनाची चौकशी करायला हवी. राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप कडू यांनी केला आहे.

    नवी दिल्ली: शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्यावरून गंभीर विधान केलं आहे. राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका आहे. राष्ट्रपतींनी याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

    बच्चू कडू हे दिल्लीत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यपाल नियमबाह्य काम करतात. त्यात राष्ट्रपतींनी लक्ष घालायला हवं. राष्ट्रपतींनी आता राजभवनाची चौकशी करायला हवी. राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप कडू यांनी केला आहे.

    मंदिर आणि शाळा उद्यापासून उघडाव्यात असं मलाही वाटतं. पण मंदिरं जाणीवपूर्वक बंद ठेवलेले नाहीत. आर्थिक कोंडी होतेय हे मान्य आहे. पण कोरोनाला थांबवण्यासाठी हे गरजेचं आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.