Lawsuit filed against Serum Institute, which manufactures corona vaccine; Complaint of Nanded Pharmaceutical Company

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. 18+ पासून वेगवेगळ्या गटांना प्राधान्यक्रमाने लस दिली जात आहे. परंतु देशातील अनेक भागात लशींचा तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी 18+ला लसच मिळत नाही तर 45+ वयोगटातील नागरिकांनाही वाट पहावी लागत आहे. लस तुटवड्याच्या स्थितीवर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवरच खापर फोडले आहे.

    दिल्ली : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. 18+ पासून वेगवेगळ्या गटांना प्राधान्यक्रमाने लस दिली जात आहे. परंतु देशातील अनेक भागात लशींचा तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी 18+ला लसच मिळत नाही तर 45+ वयोगटातील नागरिकांनाही वाट पहावी लागत आहे. लस तुटवड्याच्या स्थितीवर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवरच खापर फोडले आहे.

    केंद्र सरकारने लशींच्या साठ्याची माहिती न घेताच तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक तत्त्वांचा विचार न करताच 18+ वयोगटातील लसीकरणास परवानगी दिल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

    दरम्यान, लसीकरण आवश्यक आहे परंतु लस घेतल्यानंतर लोकांना संसर्ग होत आहे. म्हणून लोकांनी जागरुक राहण्याची गरज आहे, असे जाधव म्हणाले. लसीकरणानंतरही लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. ते म्हणाले की, व्हॅक्सिन व्हेरिएंटच्या डबल म्युटंटवरदेखील प्रभावी आहे. तरीही व्हेरिएंट लसीकरणात अडचणी आणू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

    प्रारंभी 30 कोटी लोकांना लस दिली जाणार होती, त्यासाठी 60 कोटी डोसची आवश्यकता होती. आम्ही टार्गेट पूर्ण करण्याआधीच सरकारने 45+ वयोगटातील सर्व लोकांचे लसीकरण तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु केले. आमच्याकडे लसींचा एवढा साठा नसल्याचेही सरकारला माहित होते. यावरून आपल्याला एक शिकवण मिळते की, उत्पादनाची उपलब्धता लक्षात घेऊन ती योग्यरित्या वापरली पाहिजे.

    - सुरेश जाधव, कार्यकारी संचालक, सीरम