लस द्यायला आलेल्या, आरोग्य कर्मचाऱ्यांवर आजीबाईचा चढला रागाचा पारा… व्हडिओ झाला व्हायरल

आजींना लस घेण्यासाठी काहीजण विनंती करत आहेत मात्र त्या नकार देत आहेत. सोशल मीडियावर कोरोना लसीबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. यावरून ग्रामीण भागातील लोक लस घेण्यासाठी घाबरत असल्याचं हे स्पष्ट दिसत आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना प्रशासनाकडून लसीकरण भर देताना दिसत आहेत. अनेक नागरिकांना लस घेतल्यानंतर थोडासा त्रास होणं किंवा काहींचा मृत्यु झाला. याचाच धागा पकडत अनेक अफवाही सोशल माध्यमांवर पसरल्या आहेत.

    सोशल मीडियावरील अफवांमुळे लसीबाबत खोटी माहिती पसरल्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण लस घ्यायला घाबरत आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक आजीबाई लस घ्यायला नकार देत आहेत. त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे मात्र लसीमुळे मृत्यु होण्याच्या भीतीने त्या लस घ्यायला भीत आहेत. त्यांना लस द्यायला पथक आलेलं आहे मात्र त्या म्हणत आहेत की मरेल पण लस घेणार नाही.

    आजींना लस घेण्यासाठी काहीजण विनंती करत आहेत मात्र त्या नकार देत आहेत. सोशल मीडियावर कोरोना लसीबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. यावरून ग्रामीण भागातील लोक लस घेण्यासाठी घाबरत असल्याचं हे स्पष्ट दिसत आहे. आजीबाईंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.