शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘ग्रेट खली’ उतरला मैदानात

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन कुस्तीपटू दलीपसिंग राणा उर्फ द ग्रेट खली याने केलं आहे.

नवी दिल्ली: ‘ते पीकांची खरेदी २ डॉलर ने करतील आणि २०० डॉलरने दराने त्याची विक्री करतील’ केंद्र सरकारच्या या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे  दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन कुस्तीपटू (wrestler)  दलीपसिंग राणा उर्फ द ग्रेट खली (The great Khali)याने केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Great Khali (@thegreatkhali)

खली यांनी सोशल मीडियातील इन्स्टाग्राम साईटवरून हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या धोरणामुळे छोट्यामोठ्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल. शेतात मजुरी करणाऱ्यांना रोजगार राहणार नाही. सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडेल, असेही तो म्हणाला आहे.

याशिवाय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा  ( farmer Protest)देण्यासाठी पंजाब, हरियाणातील कलाकार मंडळीही मैदानात उतरली आहे. पंजाब – दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात गायक सिद्धू मूसवला, बब्बू मान, जसबीर जसी यांच्यासारखे गायकांनीही आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात मागील आठ दिवसांपासून पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.