स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणवणाऱ्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला करोनाची लागण

पोटदुखीचा त्रास होत असल्याने ३ जून रोजी रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे गुरमीत राम रहीम सिंगच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र तेथे त्याने करोना चाचणी करून घेण्यास नकार दिला. नंतर रविवारी त्याला गुरुग्राम येथली मेदांता रुग्णालयामध्ये आणखी काही चाचण्या करण्यात आल्या, त्यावेळी संसर्गाची ; लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

    दिल्ली:  बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला करोनाचा संसर्ग झाला आहे. गुरमीतला अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यासाठी वीस वर्षांचा करावास झाला आहे. कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याचे समजाताच त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

    पोटदुखीचा त्रास होत असल्याने ३ जून रोजी रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे गुरमीत राम रहीम सिंगच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र तेथे त्याने करोना चाचणी करून घेण्यास नकार दिला. नंतर रविवारी त्याला गुरुग्राम येथली मेदांता रुग्णालयामध्ये आणखी काही चाचण्या करण्यात आल्या, त्यावेळी संसर्गाची ; लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

    याबाबत माहिती देताना, सुनारिया कारागृहाचे अधीक्षक सुनील सांगवान यांनी, ‘गुरमीत राम रहीम सिंगच्या काही चाचण्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे होऊ शकल्या नाहीत. यानंतर आणखी एका सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधला असता तेथे देखील करोना परिस्थितीमुळे चाचण्या शक्य नसल्याचं कळवण्यात आलं. यानंतर कारागृह प्रशासनास या चाचण्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केल्या जाऊ शकतात असं कळवण्यात आलं. याबाबतच्या परवानग्या घेऊन पुढील चाचण्या मेदांता येथे करण्यात आल्या.

    तत्पूर्वी, मे महिन्यामध्ये त्याला भोवळ येणे व रक्तदाबात चढ-उतार या समस्या जाणवू लागल्याने त्याला एका सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. एका रात्रीच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

    दरम्यान, गुरमीत राम रहीम सिंग याला २०१७ मध्ये दोन महिला शिष्यांचा बलात्कारप्रकरणी २० वर्षांचा कारावास तर सिरसा येथील पत्रकार राम चंदेर छत्रपती यांच्या खुनप्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली आहे.