कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा

दिल्लीला जाऊन सरकार आमची मागणी मान्य करून घेतल्या शिवाय थांबणार नसल्याचे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी सांगितले आहे.

 

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेले कृषी विषयक कायदे मागे घेण्यासाठी मागील ११ दिवसांपासून दिल्ली -हरियाणाच्या (Delhi hariyana) सिंघूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकऱ्यांना(farmer) पाठिंबा देण्यासाठी भारतीय किसान यूनियन लोकशक्तीने अर्धनग्न अवस्थेत दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. संघटनेच्या आंदोलकांनी आज आम्ही सर्व कालिंदी कुंज बॉर्डरकडून दिल्ल्लीकडे निघालो आहोत. आता आम्ही थांबणार नसून, दिल्लीला जाऊन सरकार आमची मागणी मान्य करून घेतल्या शिवाय थांबणार नसल्याचे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकाने सांगितले आहे.

 

दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गाझीपूर- गाजियाबाद येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic)निर्माण झालेली दिसून आली. शनिवारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्र सरकारसोबत नुकतीच चर्चेची पाचवी बैठक पार पडली, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.