employee

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासून महागाई भत्ता मिळणार असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा थांबविलेला डीएचा निर्णय मागे घेणार असल्याचे समजते. या निर्णयानुसार दोन वर्षांचा वाढलेल्या डीएचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

    दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासून महागाई भत्ता मिळणार असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा थांबविलेला डीएचा निर्णय मागे घेणार असल्याचे समजते. या निर्णयानुसार दोन वर्षांचा वाढलेल्या डीएचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

    जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4% वाढ झाली. त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत 3% वाढ झाली. आता जानेवारी 2021 मध्ये ते 4% वाढले आहे. यासह ते 28% पर्यंत पोहोचले आहे. जानेवारी 2020 पूर्वी डीए 17 टक्के होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे.

    जून 2021 मध्ये देखील डीए 3 ते 4 टक्क्यांनी वाढू शकतो. यासह, जून 2021 मध्ये बंदी उठवल्यानंतर एकूण डीए 30 ते 32 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. सध्या डीए 17% दिले जात आहे. जूनमध्ये डीए 4 टक्क्यांनी वाढल्यास तो 32 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच जानेवारी 2020 पासून 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए जवळपास 15% वाढ होईल. केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी महागाई भत्त्यात बदल करते. बेसिक वेतन हा बेस मानून त्याची गणना टक्केवारीत केली जाते.