टेक्नॉलॉजीचा आरोग्याला धोका; जूही चावलाची कोर्टात धाव

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची वापर सुरू आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लवकरच 5जीची सेवा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले जात आहे. त्या दिशेने आता पावलंसुद्धा टाकली जात आहेत. मात्र, यातच अभिनेत्री जूही चावलाने 5 जी विरोधात भूमिका घेतली आहे. जूही चावलाने 5-जी लॉन्च करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    दिल्ली : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची वापर सुरू आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लवकरच 5जीची सेवा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले जात आहे. त्या दिशेने आता पावलंसुद्धा टाकली जात आहेत. मात्र, यातच अभिनेत्री जूही चावलाने 5 जी विरोधात भूमिका घेतली आहे. जूही चावलाने 5-जी लॉन्च करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    मी काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही. मात्र, 5 जी चा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, म्हणून रोखले पाहिजे, असे तीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. तसेच 5 जी येण्याअगोदर त्याच्या रेडिएशनचा लोकांच्या प्रकृतीवर काय परिणाम होईल त्याचा पहिल्यांदा अभ्यास व्हायला हवा, असेही तिच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

    रेडिएशनचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 5जी उपकरणांमधील रेडिएशनमुळे लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे, असे जूही चावलाने म्हटले आहे. तसेच याचिकेत तिने यासंदर्भातील अभ्यासांचा हवाला दिला आहे. 5जी तंत्र अत्यंत हानिकारक आहे. 5जी हे मानवांसाठी सुरक्षित आहे, हे सिद्ध झालेले नाही. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान सुरू होण्यापासून रोखले पाहिजे, असेही तिने म्हटले आहे.

    हे सुद्धा वाचा