होळी खेळताना वाहनाला लागलेला रंग काढताना ‘या’ टिप्स

काही सोप्या टिप्सचा वापर केला मोटरसायकल किंवा स्कूटरचा होळीच्या रंगांपासून बचाव करता येऊ शकतो, रंग सोप्या पद्धतीने काढता येऊ शकतात.

    दिल्ली: होळी खेळताना अनेकदा वाहनांही रंग लागतात.जे काढणं अतिशय कठिण होते मात्र काही सोप्या टिप्सचा वापर केला मोटरसायकल किंवा स्कूटरचा होळीच्या रंगांपासून बचाव करता येऊ शकतो, रंग सोप्या पद्धतीने काढता येऊ शकतात.

    जर तुम्ही बाईक किंवा स्कूटरला टेफ्लॉन कोटिंग केलं नसेल, तर वॅक्स पॉलिशिंग करू शकता. हे पॉलिश ऑईल पेंट किंवा तात्पुरत्या रंगांना बाईकच्या वरच्या थरावर जमू देणे. बाईकला गंज लागला असेल, तरी क्लिनिंग सॉल्युशनने तो क्लिन करा. त्यानंतर त्यावर पेंट किंवा पॉलिश लावा. हे बाईक किंवा स्कूटरवर एका सेफ कोटिंगप्रमाणे काम करेल.

    रंग लागल्यास असं करा साफ बाईकवर चुकून रंग लागल्यास, घाबरण्याची गरज नाही. बाईकला संपूर्ण वॉश करून त्यावर वॅक्स कोटिंग करा. रंग काढण्यासाठी प्रीमियम क्वालिटीच्या शॅम्पूचा वापर करू शकता. त्यानंतर बाईकवर शाइनिंगसाठी पॉलिश लावू शकता.

    जर बाईक एखाद्या बाहेरच्या ठिकाणी पार्क करत असाल, तर वॉटरप्रुफ कव्हर अतिशय गरजेचं आहे. हे कव्हर पाणी, कलर आणि इतर गोष्टींपासून बाईकचं संरक्षण करेल. हे प्लास्टिक कव्हर मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध असते.