रब्बी हंगामातील गव्ह,डाळींची केंद्र सरकारकडून उच्चांकी खरेदी ; शेतकऱ्यांना मिळाले इतके कोटी

मे महिन्याच्या अखेरपणे किमान आधारभूत किंमतीला ४०६.७६ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. ४३ लाख ५५ हजार शेतकर्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. या गव्हासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ८० हजार ३३४.५६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली: रब्बी हंगामातील गहू खरेदी करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आधारभूत किंमतीच्या आधारे जाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात सारख्या राज्यातून गव्हाची खरेदी केली जात आहे. मे महिन्याच्या अखेरपणे किमान आधारभूत किंमतीला ४०६.७६ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. ४३ लाख ५५ हजार शेतकर्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. या गव्हासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ८० हजार ३३४.५६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

    याबरोबरच खरीप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची ७ लाख १४ हजार ६९५ मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील ४ लाख २५ हजार ५८६ शेतकऱ्यांकडून ३ हजार ७४१. ३९ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची तीन कृषी कायदे रद्द करावेत ही मागणी आहे.