So who was Nathuram Godse who assassinated Gandhi? Direct question to Owaisi's Sarsanghchalak Bhagwat

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर करत भागवत आणि ओवैसी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे संबोधले आहे. त्यासोबतच ते एकमेकांचे मदतनीस असल्याचे वर्णन सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. यापूर्वी 5 जुलै रोजी सिंह यांनी एक ट्विट करत मोहन भागवतजी, तुम्ही तुमच्या शिष्यांना, उपदेशकांना, विश्व हिंदू परिषदेला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही हा विचार द्याल का? हे शिक्षण तुम्ही मोदी-शहा आणि भाजपच्या मुख्यमंत्री यांनाही देणार आहात का? असा सवाल उपस्थित केला होता.

  दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिम यांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी भागवत यांची खिल्ली उडवली आहे. जर सर्व हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर याचा अर्थ मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा डीएनएही एकच असेल. राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी म्हटले की, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, तर धर्मपरिवर्तन कायद्याचा काय फायदा?’ मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावरून दिग्विजय सिंग यांनी निशाणा साधला.

  भागवत आणि ओवैसी एकाच नाण्याच्या दोन बाजू

  माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर करत भागवत आणि ओवैसी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे संबोधले आहे. त्यासोबतच ते एकमेकांचे मदतनीस असल्याचे वर्णन सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. यापूर्वी 5 जुलै रोजी सिंह यांनी एक ट्विट करत मोहन भागवतजी, तुम्ही तुमच्या शिष्यांना, उपदेशकांना, विश्व हिंदू परिषदेला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही हा विचार द्याल का? हे शिक्षण तुम्ही मोदी-शहा आणि भाजपच्या मुख्यमंत्री यांनाही देणार आहात का? असा सवाल उपस्थित केला होता.

  मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मोहन भागवत यांच्या विधानाची बाजू घेत हे विचार देशाच्या एकात्मतेचे आणि अखंडतेचे असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच दिग्विजय सिंह यांची विचारसरणी फुटीरतावादी असल्याची टीका मिश्रा यांनी केली आहे.

  जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर धर्मपरिवर्तन कायद्याचा काय अर्थ आहे? लह जिहादच्या कायद्याचा काय फायदा आहे? आचा अर्थ असे होईल की, मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा डीएनएही एकच असेल.

  - दिग्विजय सिंग, काँग्रेस नेते