लसीकरण सर्टिफिकेट सोशल मीडियावर अपलोड करू नका, सायबर चोरांना आयती संधी देऊ नका, स्वतःचे तपशील गुप्त ठेवा, गृह खात्याची नागरिकांना सूचना

लसीकरण सर्टिफिकेटवर प्रत्येकाची वैयक्तिक माहिती असते. यामध्ये नागरिकाचं नाव, वय, लिंग आणि पुढील डोसची तारीख असे तपशील असतात. या माहितीचा गैरफायदा अनेकजण घेण्याची शक्यता असते, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. त्यावर असणारा क्यू आर  कोड स्कॅन करून इतर तपशीलही सायबर गुन्हेगार मिळवू शकतात आणि सरकारी कर्मचारी असल्याचा बहाणा करून ग्राहकांची फसवणूक करू शकतात.

  सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागली आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाची मंदावलेली प्रक्रियाही आता वेग घेत असल्याचं दिसतंय. अनेक नागरिक लसीकरण झाल्यानंतर मिळणारं सर्टिफिकेट हे सोशल मीडियावर शेअर करत असल्याचं दिसतं. मात्र हा प्रकार नागरिकांना महागात पडू शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलाय.

  लसीकरण सर्टिफिकेटवर प्रत्येकाची वैयक्तिक माहिती असते. यामध्ये नागरिकाचं नाव, वय, लिंग आणि पुढील डोसची तारीख असे तपशील असतात. या माहितीचा गैरफायदा अनेकजण घेण्याची शक्यता असते, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. त्यावर असणारा क्यू आर  कोड स्कॅन करून इतर तपशीलही सायबर गुन्हेगार मिळवू शकतात आणि सरकारी कर्मचारी असल्याचा बहाणा करून ग्राहकांची फसवणूक करू शकतात.

  पहिल्या लसीकरणाचे तपशील असल्यामुळे नागरिकांचा अशा प्रकारांवर विश्वास बसतो आणि ते फोनवरील व्यक्तीला त्याने विचारलेली इतर माहितीदेखील देत असल्याचे अनुभव आले आहेत. लसीकरणासाठी अनेकजणांचा पॅन कार्ड नंबर दिलेला असतो. इतर तपशीलांसह पॅन कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागला, तर त्याद्वारे तुमच्या आर्थिक व्यवहारांचे सर्व तपशील त्यांना मिळू शकतात.

  अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • दुसरा डोस घेतल्यानंतरच सर्टिफिकेट डाऊनलोड करा
  • सोशल मीडियावर सर्टिफिकेट अपलोड करू नका
  • लसीकरणासंदर्भात कुठल्याही कॉलवर ओटीपी शेअर करू नका
  • कुठलाही फेक मेसेज किंवा लिंक फॉरवर्ड करू नका
  • इतर कुणी असे करत असेल, तर त्यांना जागरुक करा