ईएसआयसी चालविणार रुग्णालये; कर्मचाऱ्यांना मिळणार चांगल्या सुविधा

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) आपल्या लाभार्थ्यांच्या सेवांच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ईएसआयसी आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना घराजवळील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळाली आहे.

    दिल्ली (Delhi).  कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) आपल्या लाभार्थ्यांच्या सेवांच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ईएसआयसी आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना घराजवळील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळाली आहे. आरोग्य विमा योजनेतील लाभार्थीच्या घराच्या दहा किमीच्या परिसरात जर ईएसआयसी रुग्णालय नसेल तर कर्मचारी राज्य राज्य विमा महामंडळाच्या पॅनेलमध्ये समावेश असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकतात.

    कामगार मंत्रालयाने असे म्हटले आहे की, जर राज्य सरकारने स्वतःच रुग्णालय चालविण्याचा आग्रह धरला नाही तर सर्व नवीन रुग्णालये आणि भविष्यातील रुग्णालये ईएसआयसीद्वारेच चालविली जातील. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. लाभार्थ्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा पुरविणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    बैठकीत निर्णय
    कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 183 व्या बैठकीत कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवांचा पुरवठा आणि इतर फायदे सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

    ऑनलाइन परवानगी
    जर एखाद्या लाभार्थ्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्यास नियुक्त रुग्णालयाने 24 तासांच्या आत लाभार्थ्यास कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ईएसआयच्या अधिकृत अधिकाऱ्यामार्फत ऑनलाईन परवानगी घेणे आवश्यक आहे.