Houses built without brick, sand, cement; Houses to be built instantly

लाईट हाऊस प्रकल्पाअंतर्गत देशातील 6 ठिकाणी हजारो घरे द्रुतगतीने उभारली जाणार आहेत. ही घरे इन्क्युबेशन सेंटर ठरणार आहे. यामुळे देशातील प्लॅनर्स, आर्किटेक्ट, अभियंता आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे आणि नवीन तंत्रज्ञानासोबत प्रयोग करणे शक्य होणार आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 6 लाईट हाऊस प्रकल्पाची कामे सुरू असून, यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरसिंग आणि ड्रोनव्दारे लाईट हाऊस या देशव्यापी प्रकल्पाचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 1 जानेवारी 2021 रोजी लाईट हाऊस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला होता. या प्रकल्पात नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या तंत्रज्ञानामुळे या गृह प्रकल्पांचे काम वेगात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, विट, रेती आणि सीमेंटविना ही घरे बांधली जात आहे.

    6 प्रकल्पांची कामे सुरू

    लाईट हाऊस प्रकल्पाअंतर्गत देशातील 6 ठिकाणी हजारो घरे द्रुतगतीने उभारली जाणार आहेत. ही घरे इन्क्युबेशन सेंटर ठरणार आहे. यामुळे देशातील प्लॅनर्स, आर्किटेक्ट, अभियंता आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे आणि नवीन तंत्रज्ञानासोबत प्रयोग करणे शक्य होणार आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 6 लाईट हाऊस प्रकल्पाची कामे सुरू असून, यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. याबाबत उदाहरण द्यायचे झाले तर मध्य प्रदेशातील इंदूरमधील या प्रकल्पात विटा किंवा सिमेंटचा वापर न करता त्याऐवजी प्री फॅब्रिकेटेड सॅंडविच पॅनेल सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.

    राजकोटमध्ये फ्रेंच तंत्रज्ञानाचा वापर

    गुजरातच्या राजकोटमधील लाईट हाऊसमधील घरे फ्रेंच तंत्रज्ञान आणि बोगद्याच्या सहाय्याने अखंड काँक्रिट बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून उभारली जात आहेत. ही घरे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यास अधिक सक्षम असतील. उत्तर प्रदेशातील लखनौ येथील लाईट हाऊस प्रकल्पात कॅनडातील तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या तंत्रज्ञानानुसार भिंतींना प्लॅस्टर करण्याची किंवा पेंट करण्याची गरज नाही. कारण येथे तयार भिंतींच वापरल्या जातील. तमिळनाडूतील चेन्नईमधील लाईट हाऊस प्रकल्पात युएस आणि फिनलॅंड येथील तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तर, झारखंडमधील रांची येथील प्रकल्पात जर्मनीतील 3 डी कस्ट्रक्शन सिस्टीमचा वापर करून घरे उभारण्यात येणार आहेत. त्रिपुरामधील आगरतळ्यात या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी न्यूझीलंडमधील तंत्रज्ञानानुसार स्टील फ्रेम वापर केला जाणार आहे.