केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शेतकरी आंदोलनात नक्षलवादी चळवळीला समर्थन देणाऱ्या व्यक्तीचा फोटो समोर कसा काय आला?, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. नवीन कृषी विधेयकाविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील २० दिवसांपासून आंदोलन करीत आहे. या दरम्यान नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्यांचे फोटो हातात धरून आंदोलन करतानाचे व्हिडिओ आणि फोटो मीडियामधून व्हायरल झाले होते. या मुद्द्यांवरून गदारोळ उठल्यामुळे केंद्र शासनाने शेतकरी आंदोलनाच्या नावानखाली नक्षलसमर्थक घटक स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचे म्हटले होते.

दिल्ली (Delhi).  शेतकरी आंदोलनात नक्षलवादी चळवळीला समर्थन देणाऱ्या व्यक्तीचा फोटो समोर कसा काय आला?, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. नवीन कृषी विधेयकाविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील २० दिवसांपासून आंदोलन करीत आहे. या दरम्यान नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्यांचे फोटो हातात धरून आंदोलन करतानाचे व्हिडिओ आणि फोटो मीडियामधून व्हायरल झाले होते. या मुद्द्यांवरून गदारोळ उठल्यामुळे केंद्र शासनाने शेतकरी आंदोलनाच्या नावानखाली नक्षलसमर्थक घटक स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचे म्हटले होते.

कृषी विधेयकावरुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या आरोपावर नितीन गडकरींना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी सर्व शेतकरी किंवा शेतकरी संघटनांबाबत बोलत नाहीये, पण मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आमच्या गडचिरोली जिल्ह्यात एका नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. न्यायालायनेही त्याला जामीन दिला नव्हता. त्याचा आंदोलनातील फोटो कसा काय समोर आला आहे? शेती आणि शेतकऱ्यांशी त्याचा काय संबंध?”.

“काही घटक शेतकरी आंदोनलनाचा फायदा घेत त्यांची बदनामी करत आपला अजेंडा पुढे नेत आहेत,” असा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. “भारतविरोधी भाषण देणारी एखादी व्यक्ती, ज्याचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काहीच संबंध नाही त्यांचे फोटो कसे काय समोर येत आहेत? यामुळेच मी काही घटक शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून बदनामी करत अंजेडा पुढे नेत असल्याचं म्हटलं. हा शेतकरी किंवा शेतकरी संघटनांचा अजेंडा नाही. शेतकऱ्यांनी यापासून लांबच राहिलं पाहिजे हेच मला सांगायचं आहे,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याआधी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमचं सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन,” असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

“जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतकऱ्यांविरोधात काही केलेलं नाही असं सांगताना नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.