चीनने केलेल्या हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत कसे, राहूल गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली - लडाखच्या गलवान खोऱ्यात १६ जून २०२० रोजी चीनी सैन्याने घुसखोरी केली. घुसखोरी दरम्यान भारताने प्रत्त्युत्तर दिले. भारतीय जवानांनी चीनच्या ४३ जवानाना ठार केले तर भारताचे २० जवान शहीद

 नवी दिल्ली – लडाखच्या गलवान खोऱ्यात १६ जून २०२० रोजी चीनी सैन्याने घुसखोरी केली. घुसखोरी दरम्यान भारताने प्रत्त्युत्तर दिले. भारतीय जवानांनी चीनच्या ४३ जवानाना ठार केले तर भारताचे २० जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांप्रती आणि अधिकाऱ्यांप्रती काँग्रेस आमदार राहूल गांधी यांनी ट्वीट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाब विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नांचा भडीमार राहूल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.  राहूल गांधींनी ट्वीट करत म्हटले आहे की… पंतप्रधान गप्प का आहेत? ते काय लपवत आहेत? बास म्हणजे बास. आपल्याला काय घडले हे माहित असणे आवश्यक आहे. चीनने आमच्या सैनिकांना मारण्याचे धाडस कसे केले? त्यांची जमीन घेण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?

शहीद झालेल्या भारतीय जवानांप्रती आणि अधिकाऱ्यांप्रती काँग्रेस आमदार राहूल गांधी यांनी ट्वीट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. राहूल गांधींनी ट्वीट करत म्हटले आहे की आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या अधिकारी आणि जवान यांच्याबद्दल मला वेदना होत आहेत परंतु या वेदना शब्दात वर्णन करू शकत नाहीत. त्यांच्या सर्व प्रियजनांविषयी मी संवेदना व्यक्त करतो. या कठीण वेळी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.

लडाखमधील भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात चीन्यांनी केलेल्या घुसखोरी आणि भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यात भारताने जोरदार प्रत्युत्तर देत चीन्यांचे ४३ सैन्या मारले आहेत. परंतु चीन ही बातमी मान्य करत नाही आहे. १५ जून ला झालेल्या हल्ल्यात ३ जवान ठार झाले आहेत.