पतीला जडले पॉर्नचे व्यसन; पत्नीची न्यायालयात धाव

या महिलेने याचिकेद्वारे सांगितले आहे की, माझ्या पतीला अश्लिल चित्रफित पाहण्याची सवय लागली आहे. आपला बराच वेळ ते या चित्रफित पाहण्यात घालवतात, ज्या इंटरनेटवर अगदी सहजरित्या उपलब्ध असतात.

दिल्ली. पॉर्न साइटवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मुंबईतील एक महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून तिचे पॉर्न साइटविरोधात याचिका दाखल करण्यामागील कारणदेखील अनोखे आहे. या महिलेच्या ५५ वर्षीय पतीला पॉर्न फिल्म पाहण्याचे व्यसन लागल्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयाकडे अशा अश्लिल साइटवर संपूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आपल्या वैवाहिक जीवनावर पतीच्या या सवयीमुळे वाईट परिणाम होत असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. या वयात जर माझा सुशिक्षित पती अश्लील चित्रफित पाहण्याच्या एवढा आहारी गेला आहे. तर अशा साइटमुळे आजच्या युवा पिढीवर काय परिणाम होईल,

भविष्यातील परिस्थिती भयावह होईल, अशी भीती या महिलेने याचिकेद्वारे व्यक्त केली आहे. या महिलेने याचिकेद्वारे सांगितले आहे की, माझ्या पतीला अश्लिल चित्रफित पाहण्याची सवय लागली आहे. आपला बराच वेळ ते या चित्रफित पाहण्यात घालवतात, ज्या इंटरनेटवर अगदी सहजरित्या उपलब्ध असतात. यामुळे माझ्या पतीचे डोके दुषित झाले आहे. आमचे वैवाहिक आयुष्य उद्धवस्त झाले आहे.