RT-PCR टेस्टला आवर घाला, लॅबवरचा दबाव कमी करा, आयसीएमआरच्या नव्या सूचना

अनेकदा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येते. त्याची वास्तवात गरज नसून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसल्याचं आयसीएमआरनं म्हटलंय. त्याचप्रमाणं आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी काही सूचनाही केल्यात. 

  देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या वर आहे. एक दिवस या आकड्याने ४ लाखांाचा पल्लाही ओलांडला होता. यामुळे देशातील विविध कोरोना टेस्टिंग लॅबवर ताण येत असून तो कमी करण्यासाठी अनावश्यक चाचण्या टाळण्याचा सल्ला आयसीएमआरनं दिलाय.

  अनेकदा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येते. त्याची वास्तवात गरज नसून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसल्याचं आयसीएमआरनं म्हटलंय. त्याचप्रमाणं आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी काही सूचनाही केल्यात. 

  • ज्यांची आरटी-पीसीआर चाचणी पॉजिझीव्ह आलीय, त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येऊ नये
  • रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याची आरटी-पीसीआर टेस्ट करू नये
  • निरोगी व्यक्तींना आंतरराज्यीय प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात येऊ नये.
  • ताप किंवा कोविडची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनी प्रवास टाळावा.
  • कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींनी प्रवास करताना कोरोनाबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावं.
  • राज्यांनी आरटी-पीसीआर टेस्टची क्षमता वाढवावी, मात्र अनावश्यक चाचण्या टाळाव्यात.
  • अनावश्यक चाचण्या टाळल्या, तर गरजूंसाठी अधिक चाचण्या उपलब्ध होऊ शकतील.