जर नवरा-बायको सोबत राहू शकत नसतील तर… सुप्रीम कोर्टाने नोंदविले महत्वाचे निरीक्षण

जर नवरा-बायको(Husband and Wife Relationship) सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी एकमेकांना सोडलेलेच बरे, अशी टिपणी सुप्रीम कोर्टाने दिली. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवले. 1995 मध्ये विवाहबद्ध झालेले दाम्पत्य केवळ पाच दिवस सोबत राहिले होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट म्हणाले, जर पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी सेपरेट झालेलेच बरे.

    दिल्ली : जर नवरा-बायको(Husband and Wife Relationship) सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी एकमेकांना सोडलेलेच बरे, अशी टिपणी सुप्रीम कोर्टाने दिली. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवले. 1995 मध्ये विवाहबद्ध झालेले दाम्पत्य केवळ पाच दिवस सोबत राहिले होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट म्हणाले, जर पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी सेपरेट झालेलेच बरे.

    महत्त्वाचे म्हणजे नवरा बायकोचे वय हे 50 आणि 55 वर्ष आहे. पत्नीने हायकोर्टाने जारी केलेल्या घटस्फोटाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तुम्हाला व्यावहारिक व्हावे लागेल, आयुष्यभर केवळ कोर्टाची लढाई लढत राहणे योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
    पोटगीचा निर्णय

    हायकोर्टाने चुकीच्या पद्धतीने घटस्फोटाला मंजुरी दिली होती, असे महिलेने सुप्रीम कोर्टात सांगितले. हायकोर्टाने परस्पर सहमतीकडे दुर्लक्ष केल्याचे महिलेने म्हटले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पोटगीबाबतचा निर्णय परस्पर संमतीने घेण्याच्या सूचना केल्या. दुसरीकडे पतीनेही कोर्टासमोर आपली बाजू मांडली. आम्ही केवळ 5-6 दिवसच एकत्र राहिलो, लग्न केले तेव्हापासूनच माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. हायकोर्टाचा निर्णय योग्य होता, मला पत्नीसोबत राहायचे नाही. मी तिला पोटगीही देण्यासाठी तयार आहे, असे पतीने कोर्टाला सांगितले.
    घरजावई होण्याचा हट्ट

    पतीच्या वकिलाने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार, त्यांचे लग्न 13 जुलै 1995 रोजी झाले. त्यानंतर पत्नीने पतीला आपल्यासोबत घरजावई बनण्याचा हट्ट धरला. आपण सधन कुटुंबातील आहोत, त्यामुळे माझ्या घरीच राहू असा आग्रह पत्नीने पतीकडे केला. महत्त्वाचे म्हणजे या महिलेचे वडील आयएएस अधिकारी होते. पतीने आपली मागणी मान्य न केल्याने ती त्याला सोडून माहेरी आली. तेव्हापासून दोघांमध्ये कोर्टात लढाई सुरू आहे. आता डिसेंबर महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे.