१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते तर… मुलींच लग्नाच वय वाढवण्याविषयी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर सवाल

मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी मोदी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत विचारविनीमय सुरु असताना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलगी जर वयाच्या १५ व्या वर्षीही प्रजननक्षम असते तर लग्नाचं वय वाढवण्याची गरज काय असा प्रश्न वर्मा यांनी उपस्थित केला आहे.

दिल्ली : मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी मोदी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत विचारविनीमय सुरु असताना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मुलगी जर वयाच्या १५ व्या वर्षीही प्रजननक्षमता असते तर लग्नाचं वय वाढवण्याची गरज काय असा प्रश्न वर्मा यांनी उपस्थित केला आहे.
१५ वर्षांची मुलगीदेखील प्रजननक्षम असते असं डॉक्टर सांगतात. तर, मग मुलींच्या लग्नाचं वय २१ करण्याची काय गरज आहे. शिवराज सिंग मोठे डॉक्टर झाले आहेत का?”, असं सज्जन सिंह यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसने सज्जन सिंह यांचा बचाव करताना ते फक्त डॉक्टरांची बाजू सांगत होते असं म्हटलं आहे. भाजपा विनाकारण मुद्दा तापवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.