राजीव गांधींचे ऐकले असते तर संजय गांधी जिवंत असते; राहुल गांधींचे वक्तव्य

मोदी सरकार ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्याही हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीयांकडून आत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी, असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.

  दिल्ली (New Delhi) : काँग्रेस नेते (Congress leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, त्यांचे वडील, दिवंगत पंतप्रधान (the late Prime Minister) राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि संजय गांधी (Sanjay Gandhi) यांच्या बाबतच्या आठवणींना शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान उजाळा दिला. 23 जून 1980 रोजी नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ (Safdarjung Airport) विमान अपघातात (plane crash) संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता.

  काय म्हणाले राहूल गांधी? (What did Rahul Gandhi say about Sanjay Gandhi’s death?)
  राजीव यांनी त्यांचे धाकटे बंधू संजय गांधी यांना विमान उडवण्यास मनाई केली होती. माझे काका पिट्स हे एक विशेष प्रकारचे विमान उडवत होते. ते खूप वेगवान विमान होते. माझ्या वडिलांनी त्यांना रोखले होते; पण त्यांनी ऐकले नाही.


  माझ्या काकांना तेवढा अनुभव नव्हता. काकांना केवळ तीन ते साडेतीन तास विमान उडवण्याचा अनुभव होता. जर काकांनी माझ्या वडिलांचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे राहुल म्हणाले.

  मी दररोज सकाळी वडिलांसोबत विमानात बाहेर जायचो. आम्हा दोघांनाही विमान उडवणे आवडायचे. पायलट असणे सार्वजनिक जीवनातही बरेच काही शिकवते. ज्या दिवशी संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले, त्या दिवशी राजीव गांधी यांनी त्यांना ‘पिट्स’सारखे आक्रमक विमान उडवण्यास मनाई केली होती. पण त्यांनी ऐकले नाही.

  -- राहुल गांधी, खासदार, काँग्रेस

  रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक; राहुल गांधींचे टीकास्त्र
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून मोदी सरकारला खडेबोल सुनावले. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणे निष्क्रिय आहेत.

  रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन किंवा समर्थन देत नाहीत. मोदी सरकार ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्याही हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीयांकडून आत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी, असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.