लशीच्या दोन मात्रेतील अंतर जास्त असल्यास 300% अधिक अँटिबॉडी निर्माण होणार

एका अहवालानुसार लसीच्या दुसऱ्या मात्रेत होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. जर लसीची दुसरी मात्रा उशिराने प्राप्त झाली तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर 20 ते 300 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा खुलासा या संशोधनातून झाला आहे. अशा परिस्थितीत हे नवे संशोधन सिंगापूर आणि भारतासह अनेक देशांसाठी फायदेशीर ठरू शकते.

    दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे देशातील काही ठिकाणच्या लसीकरणाचा वेग खूप मंदावला आहे. देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीची पहिली मात्राही मिळालेली नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर हे अधिक असेल तर 300 टक्के अधिक अँटिबॉडी निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे.

    एका अहवालानुसार लसीच्या दुसऱ्या मात्रेत होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. जर लसीची दुसरी मात्रा उशिराने प्राप्त झाली तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर 20 ते 300 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा खुलासा या संशोधनातून झाला आहे. अशा परिस्थितीत हे नवे संशोधन सिंगापूर आणि भारतासह अनेक देशांसाठी फायदेशीर ठरू शकते.

    कोरोना प्रतिबंधात्मक लशींबाबत लोकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. लशीचा पहिली आणि दुसरी मात्रा वेगवेगळ्या कंपन्यांची घेता येईल का?, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. याबाबत स्पेनमध्ये नुकतेच एक संशोधन झाले. या संशोधनातून एक दिलासादायक खुलासा झाला आहे. लसीचा पहिली आणि दुसरी मात्रा वेगवेगळ्या कंपनीची घेतल्यास शरीरात 30 ते 40 पट अधिक अँटीबॉडी तयार होतील, असे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

    भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी लशींबाबतच्या संशयावर बोलताना मोठे विधान केले आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसपेक्षा जास्त अँटीबॉडी तयार होतात, असा दावा डॉ. भार्गव यांनी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीएमआरचे प्रमुख डॉ. भार्गव म्हणाले, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुरेशा अँटीबॉडीज तयार होत नाहीत, तर दुसरा डोस घेतल्यानंतर पुरेशा अँटीबॉडी तयार होत आहेत. हे नव्या अभ्यासात उघड झाले आहे. त्याचवेळी, कोविशिल्डचा प्रथम डोस घेतल्यानंतरच त्यातून चांगल्या प्रकारे अँटीबॉडी तयार होते.