पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर थांबा ; देशातील सर्व ऐतिहासिक स्मारके आणि संग्रहालये येत्या १५ जूनपर्यंत बंद

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या निर्णयाची माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे सर्व स्मारके आणि संग्रहालये येत्या १५ जूनपर्यंत वा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. देशात एकूण ३,६९३ स्मारके आणि ५० संग्रहालये आहेत. या आधी ३१ मेपर्यंत हे स्मारके आणि संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असताना , दुसरीकडे काही राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देशातील सर्व ऐतिहासिक स्मारके आणि संग्रहालये येत्या १५ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांनो, ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी जाण्याचा बेत असेल ही माहिती आधी वाचा

    केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या निर्णयाची माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे सर्व स्मारके आणि संग्रहालये येत्या १५ जूनपर्यंत वा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. देशात एकूण ३,६९३ स्मारके आणि ५० संग्रहालये आहेत. या आधी ३१ मेपर्यंत हे स्मारके आणि संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

    देशात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच राहिली तर स्मारके आणि संग्रहालये बंद ठेवण्याची तारीख आणखी वाढवली जाऊ शकते, असंही सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत घातक असल्याने सांस्कृतिक मंत्रालयाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

    गेल्यावर्षी कोरोना काळात सर्व स्मारकांना मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी जुलैमध्येच सांस्कृतिक मंत्रालयाने स्मारके, प्रार्थना स्थळे, ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळे आदींना उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र, या स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येला मर्यादा घालण्यात आली होती. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगही या ठिकाणी बंधनकारक करण्यात आले होते.