If you want a corona vaccine be self-sufficient Rahul Gandhi criticized nrms | मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा ; राहुल गांधींचं टीकास्त्र | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
दिल्ली
Published: Jun 07, 2021 08:30 AM

#Prioritiesमोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा ; राहुल गांधींचं टीकास्त्र

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा ; राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा, असं खोचक ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्वीटसोबत Priorities हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

  नवी दिल्ली –  केंद्र आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, त्याचा नवा अंक शनिवारी पाहायला मिळाला. सरकारने नोटीस बजावली असतानाच ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक भाजप व आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाउंटची “ब्लू टीक” काहीकाळ हटवून पुन्हा बहाल केली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

  राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा, असं खोचक ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्वीटसोबत Priorities हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

  कोरोनाच्या संकटकाळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्लू टिकला प्राधान्य देत आहे. सोशल मीडिया कंपन्यांसाठी केलेल्या नव्या नियमांचे पालन करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस केंद्र सरकारने ट्विटरला शनिवारी बजावली आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २४ गुरुवार
  गुरुवार, जून २४, २०२१

  नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.