कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस २०२१ स्थगित

देशातील वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर JEE (Main) मेन २०२१ सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. देशातील २३ आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced २०२१ परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains २०२१ परीक्षेला सामोरे जावे लागते. यावर्षी ४ सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे २०२१ या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित केले आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेत IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस स्थगित करण्यात आली आहे.
    मात्र पुढे नेमक्या कोणत्या तारखेला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला ध्यानात घेऊन JEE अॅडव्हांस २०२१ परीक्षा जी ०३ जुलै, २०२१ (शनिवारी) घेतली जाणार होती, ती स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल.असे अधिकृतपाने काढण्यात आलेल्या नोटीशीमध्ये सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून देशभरात JEE Advanced २०२१ परीक्षा 3 जुलै २०२१ रोजी घेतली जाणार असल्याची माहिती दिली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना ७५ टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याचे देखील पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितले होते.

    यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परीक्षेत 75 टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे JEE Advanced २०२१ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला होता. पण ही परीक्षा आता स्थगित करण्यात आली आहे.