baba ramdev

अ‍ॅलोपॅथी उपचारावर वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतलेले योगगुरु रामदेव यांनी आता कोलांटउडी घेत कोरोना प्रतिबंधक लस घेणार असल्याचे सांगितलं आहे. लवकरात लवकर मी लस घेणार आहे. तुम्हीही लस घ्या. योग आणि आयुर्वेदचा अभ्यास करा. आजारांच्या विरोधात योग ढाल म्हणून काम करते अन् कोरोनापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवतो, असे ते म्हणाले.

    दिल्ली : अ‍ॅलोपॅथी उपचारावर वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतलेले योगगुरु रामदेव यांनी आता कोलांटउडी घेत कोरोना प्रतिबंधक लस घेणार असल्याचे सांगितलं आहे. लवकरात लवकर मी लस घेणार आहे. तुम्हीही लस घ्या. योग आणि आयुर्वेदचा अभ्यास करा. आजारांच्या विरोधात योग ढाल म्हणून काम करते अन् कोरोनापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवतो, असे ते म्हणाले.

    यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली त्याचेही स्वागत केले. योग आणि आयुर्वेदचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. डॉक्टर म्हणजे या पृथ्वीवर पाठवलेले देवाचे दूत आहेत. आमचा लढा हा कोणत्याही डॉक्टरांच्या विरोधात नाही तर औषध माफियांच्या विरोधात आहे.

    दरम्यान, अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करीत आयएमएच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ही लढाई तर, औषध माफियांच्या विरोधात आहे. जे दोन रुपयांचे औषध दोन हजार आणि केव्हा केव्हा तर 10 हजार रुपयांना विकतात. गरज नसतानाही शस्त्रक्रिया करतात. कोणताही संशय नाही की सर्जरी आणि आपत्कालीन स्थितीमध्ये अ‍ॅलोपॅथी सर्वोत्कृष्ट आहे, असे ते रामदेव म्हणाले.

    हे सुद्धा वाचा