१८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस द्या, इंडियन मेडिकल असोसिएशनचं पंतप्रधान मोदींना पत्र

देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जातेय. मात्र त्याऐवजी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशननं मागणी केलीय. देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचं वितरण वेगानं आणि सर्व प्रौढांना होणं गरजेचं असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलंय. 

    देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललाय. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आटोक्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं आता पुन्हा नवनवे उच्चांक गाठायला सुरुवात केलीय. एकीकडे देशात मोठ्या संख्येनं लसीकरण सुरू असतानाही दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चाललीय. हा वेग नियंत्रणात आणण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं एक जालीम उपाय सुचवलाय.

    देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जातेय. मात्र त्याऐवजी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशननं मागणी केलीय. देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचं वितरण वेगानं आणि सर्व प्रौढांना होणं गरजेचं असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलंय.

    गेल्या २४ तासात देशात ९६,९८२ नवे कोरोना रुग्ण आढळलेत. सध्या १ कोटी २६ लाखापेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. गेल्या २४ तासात ४४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू केले, तर कोरोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात यायला मदत होईल, असं मत इंडियन मेडिकल असोशिएशननं व्यक्त केलंय.