soniya gandhi

पावसाळी अधिवेशनात पक्षाची कामगिरी प्रभावी होण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. अधीर रंजन चौधरी यांच्याकडेच लोकसभेतील गटनेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. तर गौरव गोगोईंना त्यांचे डेप्युटी म्हणून नियुक्त केले आहे.

    नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. अधीर रंजन चौधरी यांच्याकडून गटनेतेपद काढून ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे देण्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. लोकसभेतील गटनेतेपद चौधरी यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

    पावसाळी अधिवेशनात पक्षाची कामगिरी प्रभावी होण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. अधीर रंजन चौधरी यांच्याकडेच लोकसभेतील गटनेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. तर गौरव गोगोईंना त्यांचे डेप्युटी म्हणून नियुक्त केले आहे.

    के. सुरेश यांना मुख्य प्रतोद करण्यात आलं आहे. रवनीत सिंह बिट्टू आणि मनिकम टागोर हे लोकसभेतील पक्षाचे प्रतोद असतील. शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनाही या ग्रुपमध्ये सामिल करण्यात आलं आहे.