‘या’ उपायांची अंमलबजावणी करा कोरोना कधीच होणार नाही ; एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरियांनी दिला मंत्रा

देशात कोरोनाचा नवा प्रकार डेल्टा व्हेरिएंटचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशभरातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचे म्हटले आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाची तिसऱ्या लाटेचा धोका वैद्यकीय लोकांकडून व्यक्त केला जात आहे. या लाटेत कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करण्यावर
    कोरोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो जास्त संसर्गजन्य आहे का, त्याच्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत का, असे सांगता येणार नाही. परंतु, आपण कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम योग्य पद्धतीने पाळले तर आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासून बचाव करू शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले आहे.

    कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, विशेषतः हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर राखणे, यांसारख्या उपायांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाचा नवा प्रकार डेल्टा व्हेरिएंटचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशभरातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत.

    दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालणे आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.