Income Tax Return

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पाचवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना विषाणू महामारी पाहू जाता सीबीटीडीने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०२ केली आहे. या निर्णयामुळे ज्यांना विलंबित आयटीआर भरावयाचा आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. तथापि ज्या लोकांना आपला सुधारित वा विलंबित आयटीआर भरावयाचा आहे त्यांना मात्र आयटीआर भरण्यास विलंब करणे महागात पडणार आहे. तसे झाल्यास त्यांना मोठे शुल्क भरावे लागेल.

  • सावधान ! १० हजार रुपयांचा भुर्दंड बसू शकतो

दिल्ली (Delhi). इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पाचवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना विषाणू महामारी पाहू जाता सीबीटीडीने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०२ केली आहे. या निर्णयामुळे ज्यांना विलंबित आयटीआर भरावयाचा आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. तथापि ज्या लोकांना आपला सुधारित वा विलंबित आयटीआर भरावयाचा आहे त्यांना मात्र आयटीआर भरण्यास विलंब करणे महागात पडणार आहे. तसे झाल्यास त्यांना मोठे शुल्क भरावे लागेल.

या प्रकरणात होऊ शकतो दंड
– विलंबाने आयटीआर भरल्यास दंड भरावा लागू शकतो. हा दंड दहा हजार रुपयांपर्यंत असू शकतो. जर तुम्ही तुमचा आयटीआर ३१ ऑगस्ट वा ३१ डिसेंबरपूर्वी भरला तर तुम्हाला ५००० रुपयांचा भुर्दंड बसू शकतो.
– जर ३१ डिसेंबरनंतर आयटीआर भरला तर मात्र या दंडाची रक्कम वाढून ती १० हजार रुपये होऊ शकते.
– लहान करदात्यांना या प्रकरणात दिलासा देण्यात आला आहे. ५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना अधिकांश एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
– कर चोरीबाबतही आयकर विभागाच्या कठोर तरतुदी आहेत. जर २५ लाखांची करचोरी उघडकीस आली तर सहा महिने वा ७ वर्षापर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ शकते.