महाराष्ट्र, केरळमध्ये नाईट कर्फ्यू लावा; गृह मंत्रालयाने दिला सल्ला

केरळ आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सध्या कोरोनाची स्थिती बिघडलेली आहे. सध्या या दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयानेही या दोन्ही राज्यांवर विशेष नजर ठेवली आहे. दोन्ही राज्यांमधील स्थितीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जास्त कोविड-19 रुग्ण सापडणऱ्या भागांमध्ये सध्या पहिल्या टप्प्यात नाईट कर्फ्यू जारी करण्याची सूचना केली आहे.

    दिल्ली : आगामी सणवारांच्या काळात गर्दी वाढू नये तसेच आवश्यकता भासल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रतिबंध लागू करण्याचा सल्ला केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना दिला आहे. नव्या बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. देशात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून गेल्या सलग दोन दिवसात चाळीस हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण वाढत असून दोन्ही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही राज्यांना दिला आहे.

    केरळ आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सध्या कोरोनाची स्थिती बिघडलेली आहे. सध्या या दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयानेही या दोन्ही राज्यांवर विशेष नजर ठेवली आहे. दोन्ही राज्यांमधील स्थितीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जास्त कोविड-19 रुग्ण सापडणऱ्या भागांमध्ये सध्या पहिल्या टप्प्यात नाईट कर्फ्यू जारी करण्याची सूचना केली आहे.

    गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर नुकतेच एक निवेदन जारी केले. कोरोना संसर्गातील वाढ थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत, तेथे नाईट कर्फ्यूचा विचार केला पाहिजे. याव्यतिरिक्त, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारखे उपायही वाढवावे लागेल, असे सुचविले आहे. केरळ आणि महाराष्ट्राच्या वतीने मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर गृह सचिवांनी राज्यांना पत्र लिहिले आहे.