Imran-Khan's-against-Nawaz-Sharif

दिल्ली (Dehli). पाकिस्तानी लष्करप्रमुख बाजवावर निवडणुकीत गडबड करण्याचा आणि इस्लामाबादमध्ये कठपुतली सरकार स्थापन करण्याच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी पलटवार केला आहे. पीएमएल-एन सुप्रीमो नवाज शरीफ 1980 मध्ये मार्शल लॉदरम्यान जनरल जिया उल हकचे जोडे पॉलिश करून राजकारणात आले होते, अशा शब्दात इम्रान खानने नवाज शरीफ यांची टर उडविली आहे. याचबरोबर, त्यांनी नवाज शरीफांवर आक्षेपार्ह टीकाही केली आहे. नवाज शरीफ ज्या लष्कराविरोधात बोलत आहे, ते लष्कर आज देशासाठी आपले बलिदान देत आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेल्या ७० वर्षीय नवाज शरीफ यांना २०१७ मध्ये न्यायालयाने सत्तेतून बेदखल केले होते. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांच्यावर थेट निशाणा साधला. एवढेच नाही, तर शरीफ यांनी आयएसआय प्रमुख लेफ्ट. जनरल फैज हमीद यांच्यासह पंतप्रधान इम्रान खानवरही टीका केली होती. देशाचे लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयनेच आपल्याला पदच्यूत केल्याचा आरोपही शरीफ यांनी केला आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानात इम्रान खानला सत्तेत आणून ‘कठपुतली सरकार’ बनविले, असेही शरीफ यांनी म्हटले आहे.