In 1930, Tata Company introduced the first soap in the country but ...

लोक रोज अंगावर साबण घासून घासून अंघोळ करतात. शरीर स्वच्छ आणि सुंगधित ठेवायचे असेल तर साबण तर लावावेच लागेल. पण कधी साबणाचा वापर करताना तुम्ही याच्या इतिहासाचा विचार केलाय? म्हणजे भारतात पहिले साबण कधी आले आणि कोणत्या कंपनीने लॉन्च केले होते. देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी...इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत.

    दिल्ली : लोक रोज अंगावर साबण घासून घासून अंघोळ करतात. शरीर स्वच्छ आणि सुंगधित ठेवायचे असेल तर साबण तर लावावेच लागेल. पण कधी साबणाचा वापर करताना तुम्ही याच्या इतिहासाचा विचार केलाय? म्हणजे भारतात पहिले साबण कधी आले आणि कोणत्या कंपनीने लॉन्च केले होते. देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी…इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत.

    स्वातंत्र्याआधी देशात साबणाचा पहिला स्वदेशी कारखाना जमशेदजी टाटा यांनी सुरू केला होता. जमशेदजी टाटा यांनी 1918 मध्ये कोच्चिमध्ये Tata Oil Mills चा कारखाना सुरू केला होता. 1930 मध्ये टाटा कंपनीने मार्केटमध्ये पहिला साबण आणला होता. त्या साबणाचे नाव होते ‘ओके’. भारतातील पहिला आंघोळीचा साबण ओेके. टाटा ग्रुपने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त मार्केटिंग प्लानिंग केले होते.

    साबण चांगला होता आणि त्याची जाहिरातही जबरदस्त होती. मात्र, इतके ब्रांडिंग करूनही भारतातील पहिला स्वदेशी साबण भारतात टिकू शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्यावेळी लोक सुगंधित साबणाचा वापर कमी करत होते. जास्तीत जास्त लोक बेसन सारख्या देशी गोष्टींचा आंघोळीसाठी वापर करत होते. सोबतच मार्केटमध्ये लाईफबॉय साबणही होताच. कमी किंमतीचा लाईफबॉय साबण टाटाच्या ब्रॅन्डला टक्कर देत होता. ओके आल्यानंतर लाईफबॉय आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली.

    कमी पैशात लाईफबॉय लोकांना शरीरावरील कीटाणू मारणारे प्रॉडक्ट देत होते. तेच ओके जाहिरातीतून लोकांचे लक्ष आकर्षित करत होता. पण हे जास्त दिवस चालले नाही. त्यावेळी साबणावर इतके पैसे खर्च करण्याचा कुणाचा विचारही नव्हता. त्यामुळे भारतीय लोक लाईफबॉय कडे वळत होते. तर काही लोक त्यांच्या देशी जुगाडांनी आनंदी होते. याच कारणांनी टाटा ब्रॅन्डचा ‘ओके’ साबण मार्केटमध्ये आपली जागा बनवू शकला नव्हता. त्यानंतर हा साबण मार्केटमधून पूर्णपणे गायब झाला.