जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून गोळीबार, गंभीर जखमी

  • भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून गोळीबार करत पळ काढला आहे. या हल्ल्यात अब्दुल हमीद गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला. भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून गोळीबार करत पळ काढला आहे. या हल्ल्यात अब्दुल हमीद गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांना हल्ल्याची माहिती मिळताच घटनस्थळी पोहोचले. पोलीसांनी संपूर्ण परिसराला घेरवा घातला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहिम चालू केली आहे. दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्यानंतर तेथील दुसऱ्या महिला भाजप कार्यकर्त्याच्या घरात गेले पण त्या घरात नसल्यामुले तेथून पळ काढला. 

पोलीसांनी सांगितले की, भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद नाझर यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या आधी दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि सरपंच सज्जाद खांडे यांच्वार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. 

यापूर्वीही भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले

कलम ३७० आणि ३५ ए हटविण्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ४ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी कुलगामच्या मीर मार्केटमध्ये भाजपचे सरपंच आरिफ अहमद यांना गोळ्या घातल्या ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वसीम बारी यांनाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. वसीमशिवाय त्याचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या. या तिघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार सुरू होण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला.