भर पावसाळ्यात पेट्रोल-डिझेलने घेतला पेट, मागील ३७ दिवसांत पेट्रोलच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे.

    नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International level) कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.

    मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे.

    देशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या महिन्याच्या 4 तारखेपासून आतापर्यंत 22 व्या वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आतापर्यत झालेली वाढ पकडली असता ही वाढ 5.15 रुपये इतकी आहे.